Hosea 2

1“आपल्या भावांना म्हणा, अम्मी ‘माझे लोक!’
आपल्या बहिणींना म्हणा, रुहाम ‘तुमच्यावर दया करण्यात आली आहे.’”

2तुमच्या आईविरुध्द वाद घाला, वादच घाला,

कारण ती माझी पत्नी नाही,
आणि मी तीचा पती नाही.
ती आपल्या वेश्यावृत्तीचे काम स्वत:पासून सोडून देवो
आणि व्याभिचाराचे कामे तिच्या उरांपासून दूर होवो.
3जर नाही, तर मी
तिला नग्न करून जन्माच्या वेळी होती
तशी नग्न करीन,
मी तिला ओसाड, रुक्ष भूमी सारखे करीन
आणि मी तिला तहानेने मारीन.

4तिची मुले वेश्यावृत्तीमुळे असल्याने

मी कसलीच दया त्यांच्यावर करणार नाही.
5त्यांची आई वेश्या राहलेली आहे
व तिचे गरोदर राहणे लज्जास्पद प्रकार आहे,
ती म्हणाली, मी माझ्या प्रियकरांकडे जाईल,
कारण ते मला माझी भाकर आणि पाणी,
माझी लोकर आणि ताग,
माझे तेल आणि मद्य देतात.

6म्हणून मी तीच्या मार्गात काटेरी कुंपण घालीन,

मी तीच्या विरुध्द भिंत बांधीन म्हणजे
तिला वाट सापडणार नाही.
7ती तिच्या प्रियकरांच्या मागे धावेल
पण ती त्यांना गाठु शकणार नाही,
ती त्यांचा शोध करेल पण ते तीला सापडणार नाही.
मग ती म्हणेल,
मी माझ्या पहिल्या नवऱ्याकडे परत जाईल,
कारण माझी दशा आतापेक्षा
तेव्हा चांगली होती.

8कारण तिला हे ठाऊक नाही की,

तो मी होतो ज्याने तिला धान्य, द्राक्षारस,
तेल पुरवली व सोने आणि चांदी सढळपणे दिली,
नंतर जी तिने बआल मुर्तीस दिली.
9म्हणून मी हंगामाच्या वेळी
तिचे धान्य आणि ऋतुच्या वेळी तिचा द्राक्षारस परत घेईन.
तिची लाज झाकण्यासाठी दिलेली
माझी लोकर व ताग सुध्दा परत घेईन.

10नंतर मी तिच्या प्रियकरांसमोर तिला नग्न करीन

व त्यापैकी कोणीही तिला माझ्या हातून सोडवू शकणार नाही.
11मी तीचा आनंद नष्ट करीन तसेच तिचे उत्सव, सण, चंद्रदर्शन,
शब्बाथ आणि नेमलेले सर्व सण मी बंद करीन.

12मी तिच्या द्राक्षवेली

आणि अंजिराची झाडे नष्ट करीन,
ज्या विषयी ती म्हणाली होती,
माझ्या प्रियकरांनी दिलेली ही माझी वेतने आहेत.
मी त्याचे रान करीन आणि वन्य पशू येऊन ते फस्त करतील.
13तिने बआलास धूप दिला
आणि नथ व दागिने घालून स्वत: नटली.
मला विसरून आपल्या प्रियकरांमागे गेली
म्हणून मी तीला शिक्षा करीन असे परमेश्वर म्हणतो.

14यास्तव, मी तीला परत मिळविन मी तीला जंगलात घेऊन जाईल

आणि प्रेमाने तिच्याशी बोलेन.
15मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन,
आशेचे दार म्हणून अखोरचे खोरे देईन.
तेव्हा ती मला उत्तर देईल, जसे तिने आपल्या तरुणपणे दिले होते,
जेव्हा ती मिसर देशातून आली होती.

16हे परमेश्वर घोषित करतो की,

त्या दिवसात असे होईल की तू मला इशी, म्हणजे, माझा नवरा म्हणशील,
आणि पुन्हा मला बाली, म्हणजे, धनी म्हणणार नाहीस.
17कारण मी तिच्या मुखातून बआलाची नावे काढून टाकेन,
व तिला त्यांची नावे त्यानंतर आठवली जाणार नाही.

18त्या दिवशी मी इस्राएलासाठी

वनपशु, आकाशातील पाखरे,
भूमीवर रांगणारे ह्यांसोबत करार करीन.
मी देशातून धनुष्य तलवार
आणि लढाई नाहीशी करीन
व ते तेथे सुरक्षित वस्ती करतील.

19मी तुझा कायमचा वाग्दत्त पती होईल.

मी धर्म, न्याय, करार, विश्वासूपण आणि दया ह्यात तुझा वाग्दत्त पती होईल.
20मी तुला विश्वासूपणे वाग्दत्त करीन
व तू हे जाणशील की, मी परमेश्वर आहे.

21आणि त्या दिवशी,

मी उत्तर देईन, असे परमेश्वर घोषीत करतो,
मी आकाशाला उत्तर देईल
आणि आकाश भूमीला उत्तर देईल.
22आणि भूमी धान्य, नवा द्राक्षारस
आणि तेल देईल आणि ते इज्रेलास उत्तर देतील.

मी स्वत:साठी तिचे रोपण भूमीत करीन

आणि लो रुहामावर दया करीन
जे माझे लोक नव्हते त्यास मी माझे लोक म्हणेन
आणि ते मला तू माझा देव आहेस असे म्हणतील.
23

Copyright information for MarULB